Alandi : एमआयटी आर्टस् कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात ड्रोन बिल्डिंग वर्कशॉपचे आयोजन

एमपीसी न्यूज : आळंदी येथील एमआयटी आर्टस् कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात  दि.20 व 21 एप्रिल  रोजी  ड्रोन बिल्डिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांना ड्रोन बिल्डिंग संबंधित तंत्रज्ञान व ड्रोन कसे बनवायचे हे शिकवले गेले. (Alandi) ड्रोन बिल्डिंग वर्कशॉप आयोजित करण्याचा मुख्य उद्देश ड्रोन तयार करण्याच्या प्रक्रियेच्या संबंधित तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना माहिती आणि अनुभव मिळवून देणे हा होता.

या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना ड्रोन तयार करण्याची प्रक्रिया, उपकरणे आणि संचालन या बद्दल माहिती दिली गेली, ज्यामुळे त्यांना ड्रोन तयार करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि माहिती मिळाली. या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांनी ड्रोनची अंतिम रचना केली तसेच आयोजनाच्या शेवटी, सर्व विद्यार्थ्यांनी त्यांनी बनविलेल्या ड्रोनचा डेमो दाखविला, हा ड्रोन व्हिडिओ शूटिंगसाठी तसेच पुष्पवर्षाव करण्यासाठी वापरता येऊ शकतो.

Pune : रेडॉन रायडर्सने साजरा केला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस

या नंतर, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ड्रोनचे महाविद्यालयास हस्तांतरण करण्यात आले, या वेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, उपप्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हा वर्कशॉप एमआयटी आर्टस् कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय आळंदी आणि नोनएअरो या स्टार्टअप कंपनी च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला गेला. वर्कशॉप यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. सुनील महाजन आणि नोनएअरो या स्टार्टअपचे संचालक  विराज देसाई,  अथर्व महाजन, चेतन शर्मा व  निल गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले.याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.