Alandi: सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी घेतले माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन

एमपीसी न्यूज -आळंदी येथे प पू स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Alandi )यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत (चाकण चौक )वारकरी शिक्षण संस्थेसमोर (Alandi )हे आयोजन करण्यात आले आहे.याच निमित्ताने आज दि.5 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आळंदी मध्ये आगमन झाले होते.

Mp Shrirang Barne : खासदार श्रीरंग बारणे यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद; ‘ऑन द स्पॉट’ समस्या निकालात

तसेच त्यांनी माऊली मंदिरात जाऊन श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संजीवन समाधीचे दर्शन घेतले.व पूजन केले. यावेळी देवस्थान च्या वतीने प्रमुख विश्वस्त ॲड राजेंद्र उमाप,विश्वस्त योगी निरंजन नाथ यांच्या हस्ते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा शाल ,श्रीफळ व माऊलींची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.


तसेच आज प पू स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवानिमित्ताने ग्रंथ शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अनेक वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.