Mp Shrirang Barne : खासदार श्रीरंग बारणे यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद; ‘ऑन द स्पॉट’ समस्या निकालात

एमपीसी न्यूज – मावळचे शिवसेना श्रीरंग बारणे यांच्या दर शनिवारी (Mp Shrirang Barne) आणि रविवारी होणाऱ्या जनता दरबाराला पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. बारणे यांच्याकडून ‘ऑन द स्पॉट’ समस्या निकालात काढली जाते. त्यामुळे दरबाराची गर्दी वाढू लागली. रविवारी झालेल्या दरबारातील गर्दीमुळे बारणे यांनी रस्त्यावर येऊन नागरिकांचे गाऱ्हाणे, समस्या जाणून घेतल्या.

लोकसंपर्क, नम्र, सतत लोकांना भेटणे, लोकांसाठी सहजउपलब्ध होणे, चोवीस तास उपलब्ध असणारे लोकप्रतिनिधी अशी खासदार श्रीरंग बारणे यांची ओळख आहे. कोणाबद्दल आकस ठेवत नाहीत. विरोधी पक्षाचा कार्यकर्ता काम घेऊन आला तरी ते मार्गी लावतात. खासदार (Mp Shrirang Barne) बारणे हे थेरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात दर शनिवारी आणि रविवारी जनता दरबार घेतात. सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत हा दरबार सुरू असतो. शहराच्या विविध भागातील लोक दरबारात येऊन आपल्या तक्रारी मांडतात.

Chinchwad : एसएनबीपी विधी महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबीर संपन्न

रविवारी झालेल्या जनता दरबाराला मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळपासून नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. खासदार बारणे हे दरबारात आलेल्या नागरिकांचे म्हणणे, गा-हाने, तक्रार ऐकून, समजावून घेतात. त्यानंतर तत्काळ संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून प्रश्न तातडीने निकाली काढला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. बारणे यांचे कार्यालय रस्त्याच्या कडेला आहे. जनता दरबाराला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाहने लावण्यासाठी जागा नव्हती. एवढी गर्दी झाली होती. दरबाराला वाढणारी गर्दी पाहता याचा आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार बारणे यांना फायदा होईल असे बोलले जाते. खासदार बारणे यांचे पारडे जड दिसते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.