Alandi : अंत्ययात्रेला महाद्वार चौकात नो पार्किंगच्या जागेत पार्क केलेल्या दुचाकींचा अडसर

एमपीसी न्यूज – आळंदी येथे महाद्वार चौक येथील रस्त्यावर नो पार्किंगच्या  ( Alandi ) फलका शेजारीच बेशिस्तपणे, बेकायदेशीरपणे अनेक दुचाकी वाहने लावली जातात. त्याचा त्रास वारंवार तेथून रहदारी करणाऱ्या नागरिकांना होतो.दुचाकीच्या पार्किंग मुळे तेथील रस्ता अरुंद बनतो. तेथून रहदारी करणाऱ्या वाहनांचा धक्का काही वेळेस पायी चालणाऱ्या नागरिकांना लागतो किंवा रस्ता अरुंद झाल्यामुळे रहदारी करताना वाहतूक समस्या उद्भवतात त्यामुळे वेळोवेळी त्या कारणामुळे तेथे मोठ्या प्रमाणात वाद विवाद होत असतात.

Pune : बारावीच्या पहिल्या पेपरला राज्यभरात 58 गैरप्रकांराची नोंद, पुण्यात 15 गैरप्रकार उघडकीस

 तसेच शहरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अंत्ययात्रेवेळी त्याची अंत्ययात्रा  महाद्वारा चौकातून माऊलींच्या महाद्वारा समोर बाहेर काही क्षणासाठी आणून ती पुढे स्मशानाकडे मार्गस्थ होत असते. परंतु महाद्वार रस्त्यावर नो पार्किंग च्या जागेतच बेकायदेशीररित्या दुचाकी पार्किंग केली जाते. त्यामुळे माऊलींच्या महाद्वारासमोर त्या अंत्ययात्रेला जाण्यासाठी त्या दुचाकींचा अडथळा निर्माण होतो. तो अडथळा दूर करण्याचे कार्य अंत्ययात्रेला नागरिकांनाच वारंवार करावे लागताना दिसून येते. अलंकापुरीचे अंतिम सत्य मरण पावलेल्या  मानवास  नेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो ? अशी व्यथा इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे विठ्ठल शिंदे यांनी एका व्हॉट्स अप ग्रुप वरती मांडली आहे.

तसेच अत्यंयात्रेला दुचाकी वाहनांची कशी अडचण होत आहे, याचे छायाचित्र त्यांनी शेअर  केले आहे. महाद्वार चौक रस्त्यावरील नो पार्किंगच्या जागेत दुचाकी वाहने लावली असतात. त्यावर वाहतुक पोलिसांद्वारे नो पार्किंगची दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु तिथे ती वाहने लागू नये यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजे आहे. यासंदर्भातील  मागणी वेळोवेळी ग्रामस्थांद्वारे केली  ( Alandi ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.