Pune : पोलिसात दाखल गुन्ह्यातून सुटका करतो सांगत 25 हजारांची लाच स्विकारणाऱ्या एकाला अटक

एमपीसी न्यूज –  पोलिसात दाखल गुन्ह्यात पोलिसांकडून मदत ( Pune)  करेन म्हणत 25 हजारांची लाच घेणाऱ्या तरुणाला लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने अटक केली आहे. ही कारवाई कात्रज येथील सुखसागर परिसरात बुधवारी (दि.21) केली .

तुषार शितल बनकर (वय 30, रा. आंबेगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bopkhel : बोपखेल पुलाच्या रखडलेल्या 10 टक्के कामाला सुरुवात

पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सायबर गुन्हा दाखल आहे. यागुन्ह्यांचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांची मदत मिळवून देतो, हे प्रकरण मिटवण्यासाठी म्हणून आरोपीने फिर्यादीकडे 1 लाख रुपयांची मागणी केली.

 

या 1 लाखातूल पहिला टप्पा म्हणून बुधवारी 25 हजार रुपये स्विकारताना लाचलुचपत विभागाने सापळा रचून बुधवारी रंगेहात आरोपीला पकडले. याचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करत ( Pune)  आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.