Chinchwad : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस ॲक्शन मोडवर; तीन टोळ्यांवर मोका, तिघांवर एमपीडीए तर 17 गुन्हेगार तडीपार

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड ( Chinchwad) पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. निवडणुका भयमुक्त, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी, वाकड, निगडी पोलीस ठाण्यातील तीन टोळ्यांवर संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम (मकोका) अंतर्गत, वाकड, दिघी आणि पिंपरी मधील तीन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. तर वाकड, महाळुंगे, चिखली, देहूरोड आणि पिंपरी परिसरातील तब्बल 17 गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

तीन टोळ्यांवर मकोका

पिंपरी परिसरातील गुन्हेगार सुरज उत्तम किरवले (टोळी प्रमुख – वय 24, रा. घरकुल, चिखली), यश ऊर्फ पाशा कैलास भोसले (वय 21, रा. रिव्हर रोड, पिंपरी), अविनाश प्रकाश माने (वय 22, रा. बौध्दनगर, पिंपरी), गणेश जमदाडे (रा. भाटनगर, पिंपरी) यांच्या विरूध्द खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडयाची तयारी, गंभीर दुखापत, दुखापत, अग्निशस्त्रे जवळ बाळगणे असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात या टोळीवर मकोका लावण्यात आला आहे.

वाकड परिसरातील गुन्हेगार रोहीत मोहन खताळ (टोळी प्रमुख – वय 21, रा. थेरगाव), साहील हानीफ पटेल (वय 21, रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे), ऋषीकेश हरी आटोळे (वय 21, रा. शिवदर्शन कॉलनी, थेरगाव), शुभग चंद्रकांत पांचाळ (वय 23, रा. अष्टविनायक कॉलनी, काळेवाडी), अनिकेत अनिल पवार (वय 27, रा. पवारनगर, थेरगाव), प्रितम सुनिल भोसले (वय 20, रा. आदर्शनगर, काळेवाडी), शिवशंकर शामराव जिरगे (वय 22, रा. दत्तनगर, थेरगाव), सुमित सिद्राम माने (वय 23, रा. शिवराजनगर, रहाटणी),

Pune : पोलिसात दाखल गुन्ह्यातून सुटका करतो सांगत 25 हजारांची लाच स्विकारणाऱ्या एकाला अटक

गणेश बबन खारे (वय 26, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव), अजय भिम दुधभाते (वय 22, रा. पडवळनगर, थेरगाव), मुन्ना एकनाथ वैरागर (वय 21, रा. पवारनगर, थेरगाव), कैवल्य दिनेश जाधवर (वय 19, रा. उंड्री, हडपसर) यांच्या विरूध्द खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, वाहनांची तोडफोड करणे, बेकायदेशीर हत्यारे, अग्निशस्त्रे जवळ बाळगणे असे एकूण 19 गुन्हे बीड, अहमदनगर आणि पिंपरी-चिंचवड येथे दाखल आहेत. वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका दरोड्याच्या गुन्ह्यात आरोपींवर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे.

निगडी परिसरातील गुन्हेगार अमन शंकर पुजारी (टोळी प्रमुख – वय 22, रा. पांढारकर वस्ती, पंचतारानगर, आकुर्डी), शिवम सुनिल दुबे (वय 21, रा. पांढारकर चाळ, पंचतारानगर, आकुर्डी), रत्ना मिठाईलाल बरुड (वय 36, रा. पांढारकर वस्ती चौक, पंचतारानगर, आकुर्डी) यांच्या विरोधात कट करुन खून करणे, दरोडा, दुखापत, तोडफोड करणे, बेकायदेशीररित्या घातक हत्यारे जवळ बाळगणे असे एकूण सहा गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत. निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात आरोपींवर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे.

या तिन्ही टोळ्यामधील सर्व आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस ठाण्यांकडून या टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला. त्यानंतर या गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

तीन गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध

वाकड पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुप्रसिध्द गुन्हेगार संदेश ऊर्फ शिलव्या लाजरस चोपडे (रा. अमरदिप कॉलनी, काळेवाडी) याच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत. दिघी पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुप्रसिध्द गुन्हेगार अनिकेत ऊर्फ गुड्या संजय मेटकरे (रा. भारतमातानगर, दिघी) याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. पिंपरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुप्रसिध्द गुन्हेगार दिपक सुरेश मोहिते (रा. नेहरूनगर, पिंपरी) याच्यावर दहा गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्या अंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

17 गुन्हेगार तडीपार

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाकड मधील दोन, महाळुंगे एमआयडीसी मधील एक, चिखली मधील एक, देहूरोड मधील दोन आणि पिंपरी मधील 11 गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले ( Chinchwad) आहे.

तडीपार गुन्हेगाराचे नाव (पत्ता, तडीपारीचा कालावधी)

वाकड पोलीस ठाणे
आनंद किशोर वाल्मिकी (वय 29, रा. काळा खडक वाकड. 2 वर्ष)
आशिष एकनाथ शेटे (वय 24, रा. नखाते वस्ती रहाटणी. 1 वर्ष)

महाळुंगे पोलीस ठाणे
संकेत माणिक कोळेकर (वय 22, रा. धामणे, ता. खेड. 1 वर्ष)

चिखली पोलीस ठाणे
आकाश बाबु नडविन मणी (वय 21, रा. मोरेवस्ती चिखली. 2 वर्ष)

देहूरोड पोलीस ठाणे
रोहित उर्फ गब-या राजस्वामी (वय 22, रा. एमबी कॅम्प देहुरोड. 1 वर्ष)
ऋषिकेश उर्फ श-या अडागळे (वय 24, रा गांधीनगर देहूरोड. 2 वर्ष)

पिंपरी पोलीस ठाणे
सुरज रामहरक जैस्वाल (वय 21, रा. नेहरुनगर पिंपरी. 2 वर्ष)
शुभम राजु वाघमारे (वय 22, रा. नेहरुनगर, पिंपरी. 2 वर्ष)
वृषभ नंदू जाधव (वय 21, रा. इंदिरानगर चिंचवड. 2 वर्ष)
शेखर उर्फ बका बाबु बोटे (वय 20, रा. इंदिरानगर चिंचवड. 2 वर्ष)
शुभम अशोक चांदणे (वय 19, रा. इंदिरानगर चिंचवड. 2 वर्ष)
शांताराम मारुती विटकर (वय 34, रा. इंदिरानगर चिंचवड. 2 वर्ष)
अनुराग दत्ता दांगडे (वय 19, रा. इंदिरानगर चिंचवड. 2 वर्ष)
सागर ज्ञानदेव ढावरे (वय 20, रा. मिलींदनगर पिंपरी. 2 वर्ष)
पंकज दिलीप पवार (वय 32, रा. चिंचवड. 2 वर्ष)
सोन्या उर्फ महेश श्वेणसिध्द कांबळे (वय 21, रा. दत्तनगर चिंचवड. 2 वर्ष)
आनंद नामदेव दणाणे (वय 31, रा. विद्यानगर, चिंचवड. 2 वर्ष)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.