Lonavala : लायन्स पॉईंटवरुन पडून तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज -लायन्स पॉईंट येथे साक्षी फिरायला आली होती. तिथे तिचा तोल(Lonavala ) जाऊन ती खोल दरीत पडली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर लोणावळा पोलीस आणि शिवदूर्ग मित्र लोणावळा संस्थेचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. दोरीच्या सहाय्याने खाली उतरून साक्षीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

लायन्स पॉईंट या ठिकाणी बुधवारी रात्री दरीत पडून एका 21 वर्षीय (Lonavala)महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. आज गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सदर मुलीचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू पथकाला यश आले आहे.

साक्षी रमेश होरे (वय 21, रा. म्हासाडे कान्हूंरकर वस्ती, दावडी, पुणे) असे या मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. ती आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. काल ती एकटीच लोणावळ्यात आली होती.तिथे तिचा तोल जाऊन ती खोल दरीत पडली.

Chinchwad : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस ॲक्शन मोडवर; तीन टोळ्यांवर मोका, तिघांवर एमपीडीए तर 17 गुन्हेगार तडीपार

लायन्स पॉईंटच्या दरीमध्ये एक मुलगी पडली असल्याचा फोन शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू पथकाला गुरुवारी रात्री आला. आज सकाळी सकाळी सात वाजता शिवदुर्ग रेस्क्यू पथक लायन्स पॉईंट या ठिकाणी दाखल झाले.

लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, विजय गाले व कर्मचारी हे देखील लायन्स पॉईंट या ठिकाणी पोचले होते. रेस्क्यू पथकातील काही तरुण रोप च्या सहाय्याने दरीमध्ये उतरले. ज्या ठिकाणाहून मुलगी खाली पडली होती, त्या ठिकाणी खाली जाऊन शोध घेतला असता साधारणतः 150 मीटर अंतरावर दगडांमध्ये तिचा मृतदेह मिळून आला. पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सदरचा मृतदेह दरीमधून बाहेर काढण्यात आला.

शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील योगेश उंबरे, ओंकार पडवळ, सचिन गायकवाड, योगेश दळवी, महेश मसने, आदित्य पिलाने, सिध्देश निसाळ, कुणाल कडु, अशोक उंबरे, यश सोनावणे, विनायक शिंदे, मयुर दळवी, रमेश कुंभार, गौरव कालेकर, कपिल दळवी, समीर देशमुख, अशोक उंबरे, राजेंद्र कडु, आयुष वर्तक, अनिल आंद्रे, सुनिल गायकवाड यांनी सदरचे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.