Alandi: हा उत्सव प्रज्ञेचा, भक्तीचा आहे – आरीफ मोहम्मद खान

एमपीसी न्यूज -750 वारकरी विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (Alandi)अमृतवाणीतील 28 अभंगांच्या गायनाने आजच्या दिवसाची भक्तीमय सुरुवात केली. चिरंजीव पूजनानंतर अध्यात्मिक गुरुंचा आदर सत्कार सोहळा झाला. 
सर्व संतांच्या उपस्थितीत, त्यांचा सन्मान करत, भागवत कथा (Alandi)सप्ताहाचा दुसरा दिवस पार पडला. आज षट्तिला एकादशी आहे. याच तिथीला परम पूज्य स्वामी श्री गोविन्ददेव गिरीजी महाराज यांचा जन्म झाला. कथाकार पूज्य स्वामी श्री राजेंद्रदासजी महाराज म्हणाले, “थोर पुरुषांचा जन्म दैवी शुभ दिनी होतो आणि स्वामीजी हे अशा महात्म्यांपैकी एक आहेत.
आजच्या प्रवचनाचा केंद्रबिंदू सोप्या मार्गाने परमात्मप्राप्ती आहे” ते पुढे म्हणाले की, “परमात्माप्राप्तीनंतर या जगात प्राप्त करण्यासारखे दुसरे काहीही उरत नाही.” धर्मग्रंथ आपल्या विद्वानांच्या बुद्धिमत्तेवर प्रकाश टाकतात, आणि याची जाणीव करुन देतात की प्राचीन ग्रंथातील एक अक्षर समजून घेण्यासाठीही अनेक जन्म लागू शकतात.
स्वामीजी असेही म्हणाले की, “निष्काळजीपणा मृत्यु आहे, निष्काळजीपणावर विजय मिळवला तर मृत्यूलाच जिंकल्यासारखे आहे.” हे समजवताना ते पुढे म्हणाले, “जो एखाद्या निर्जीवाप्रमाणे झोपून जातो तो कलियुग होय. जो अर्ध निद्रेत आहे तो द्वापार युग आहे. जो आपले कर्तव्य दृढतेने बजावतो तो त्रेतायुग होय. जो कर्तव्य तत्परतेने आणि कौशल्याने पार पाडण्यासाठी प्रवृत्त आहे तो सत्ययुग होय.
गीता भक्ती अमृत महोत्सवात तिसऱ्या दिवशी, वेदशास्त्र संवादांच्या रुपात गुरु-शिष्य परंपरेचे पुनरुज्जीवन झाले. आपल्या राष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक वैदिक विद्वानांनी या संवाद-चर्चा सत्रात सहभाग घेतला. विद्वानांच्या बुद्धिवादाने श्रोत्यांना खिळवून ठेवले. ज्ञान हे वाहत्या नदीसारखे असावे हीच शिकवण आपली गुरु शिष्य परंपरा अधोरेखित करते.
परम पूज्य स्वामी श्री गोविन्ददेव गिरीजी महाराज, काळाच्या ओघात लुप्त झालेल्या याच पारंपारिक पद्धतीचे पुनरुत्थान करु इच्छितात. देशभरातील दिग्गज विद्वानांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पाहणे हा सर्व उपस्थितांसाठी एक विलक्षण अनुभव होता.
40 संतांचा, संत पूजन सोहळा झाला. अध्यात्मिक प्रगती आणि सामुदायिक कल्याणासाठी सतत कार्यरत असणे यासाठी अनेक अध्यात्मिक गुरुंचा सन्मान केला गेला. याचबरोबर, विद्वानांचा सत्कार करण्याच्या स्वामीजींच्या इच्छेनुसार अनेक वैदिक विद्वानांचा सत्कार केला गेला ज्यांनी आपल्या क्षेत्रात नैपुण्यपूर्ण कार्य केले आहे.
आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलताना गीताभक्ती अमृत महोत्सवाचे सचिव डॉ आशू गोयलजी  म्हणाले की असे कार्यक्रम जीवनात अनुभवणे ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. 2500 वैदिक आचार्यांद्वारे 81 कुंडीय महायज्ञ, त्याहून अधिक दहा हजार चंडी यज्ञ, पंच देव पूजन, वातावरण नादमय करण्यासाठी 51 ग्रंथांचे पारायण, श्रीमद्भागवत कथा हे सर्वच उपक्रम विलक्षण आहेत. आणि आपल्या भारतीय ज्ञान परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी आवश्यक आहेत.
केरळचे राज्यपाल  आरिफजी मोहम्मद खान, आजच्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते, जिथे अध्यात्मिक गुरु एम.एम. गीता मनीषी श्री ज्ञानानंदजी महाराज, श्री लोकेश मुनिजी महाराज, पूज्य स्वामी श्री विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज, श्री सदानंदजी महाराज, पूज्य मारुती कुरेकर महाराज यांचा परमपूज्य श्री गोविन्ददेव गिरजी महाराज व राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वामीजींचा 75 वा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी देवाच्या आळंदीत गीता भक्ती अमृत महोत्सवात उपस्थित सर्व संतांना त्यांनी नमन केले.
आपले मनोगत व्यक्त करताना राज्यपाल म्हणाले, “हा उत्सव प्रज्ञेचा, भक्तीचा आहे आणि व्यक्ती, समाज आणि सार्वत्रिक स्तरावर राष्ट्राचे चैतन्य आणि शक्ती जागृत करणे तसेच मानवजातीचे कल्याण या स्वामीजींच्या ध्येयाचे प्रतीक आहे. राज्यपाल म्हणाले, “आपल्या संतांचा वारसा सांगतो- “संतो भूमि तपसा धर्यन्ति” म्हणजे संतांच्या तपश्चर्येने आणि भक्तीनेच देशाचे अस्तित्व अबाधित राहते.
दिवसभर चाललेल्या या सोहळ्याची सांगता स्वामीजींच्या जन्मोत्सव सोहळ्याने झाली. जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वतीजी महाराज, प. पू. विश्वेश्वरानंदजी महाराज, प. पू.ब्रह्मेशानन्द जी महाराज, प.पू.भद्रेशदास जी महाराज हेही स्वामीजींचा सन्मान करण्यासाठी उपस्थित होते.
वेदशास्त्र संवादाचे महत्त्व सांगताना, पूज्य स्वामी श्री गोविन्ददेव गिरीजी महाराज म्हणाले, “आपल्या प्राचीन गुरु-शिष्य परंपरेमुळेच वेदांचे ज्ञान आणि प्राचीन ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचले. आपले वेद, उपनिषदे, भगवद्गीता आणि इतर प्राचीन ग्रंथ, भारतीय मूळ परंपरेमुळेच अजूनही टिकून आहेत. वेदशास्त्र संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि प्राचीन ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी, आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करते.”
गीता भक्ती अमृत महोत्सव पुन्हा एकदा आपल्या समृद्ध संस्कृतीचा, जुन्या पिढीला पुढच्या पिढीशी जोडून ठेवणार्‍या भारतीय परंपरेचा उत्सव ठरला.
450 हून अधिक कलाकार रामायण आणि भारतीय संत परंपरांवरील महानाट्य सादर करतील. आपला दैवी वैदिक वारसा, समृद्ध भारतीय संस्कृती आणि भक्ती साजरी करण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.