Alandi Toilets : आळंदी गावठाणातील नगरपालिकेच्या स्वच्छतागृहांमध्ये अंधार

एमपीसी न्यूज – आळंदी नगरपालिकेच्या (Alandi Toilets) भागीरथी नाल्याजवळ असणाऱ्या स्वच्छतागृहामध्ये काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी विद्युत दिवे बंद असल्याने पूर्णपणे अंधार झालेला दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

रात्रीच्या वेळी स्वच्छतागृहामधील विद्युत दिवे बंद असल्याने स्वच्छतागृहाच्या बाहेरच काही नागरिक लघुशंकेला जात तेथील परिसर अस्वच्छ करत आहेत. त्यामुळे स्वच्छतागृहाच्या समोरील परिसर अस्वच्छ झालेला दिसून येत आहे.

परगावावरून आलेल्या काही नागरिकांना रात्रीच्या वेळी (Alandi Toilets) स्वच्छतागृहाची आवश्यकता भासते. तेथील स्वच्छतागृहामधील विद्युत दिवे बंद अवस्थेत असल्याने त्यांना त्याचा वापर करता येत नाही.

Today’s Horoscope 25 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मरकळ चौक येथील पाण्याच्या टाकीजवळील स्वच्छतागृहामधील मुतारीमध्ये सुद्धा विद्युत दिवे बंद अवस्थेत आहेत. तेथील पुरुषांकरिता असणारी मुतारी दुरवस्थेत दिसून येत आहे. तेथील मुतारीमध्ये वॉश बेसिन आहे. परंतु त्याला पाण्याची व्यवस्था नाही. मुतारीमध्ये एका ठिकाणी कडप्पा फरशी तुटल्याची दिसून येत आहे. तेथील मुतारीमध्ये सुद्धा विद्युत दिव्यांची आवश्यकता आहे. त्या स्वच्छतागृहामधील दुरवस्थेत असलेल्या विविध वस्तूंची, विद्युत दिव्यांची इ.भागांची दुरुस्ती व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.

आळंदीत (Alandi Toilets) वेळोवेळी स्वच्छता अभियाना मध्ये स्वच्छतागृहांची दुरुस्ती होत असते. परंतु काही समाजकंटकांकडून ठिकठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहाची तोडफोड होत असल्याचे दिसून येत आहे. पालिकेने त्यावर योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे.

China Corona : घाबरु नका; चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक नाही! वुहानमधून लातूरच्या पठ्ठ्यानं सांगितली खरीखुरी कहाणी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.