Alandi : आळंदी शहरामध्ये असमान पाणी वितरण

एमपीसी न्यूज- आळंदी मध्ये गेल्या काही दिवसांपासून (Alandi) जलवितरणाचे असमान वाटप होत आहे.मरकळ रोड येथील माऊलीं पार्कसह संबंधित असलेल्या त्या विभागात गेल्या काही दिवसांपासून सतत दीड दोन तासांच्या पुढे पाणी पुरवठा होत आहे.तर शिवतेज चौक,एस टी स्टँड आदी गावठाण विभागात पाणीपुरवठा कमी वेळ होत आहे.

तर वडगांव चौक (आग्री कोळी धर्मशाळा समोरील बाजू) पदमावती रस्तावरील काही भागात रात्री उशिरा पाणी पुरवठा होऊन त्या भागात पाणीपुरवठा कमी वेळ होत आहे.गेल्या आठ दिवसांपासून ही समस्या कायम आहे.तसेच चाळीस फुटी रस्ता भागात सुद्धा पाणीपुरवठा कमी वेळ होत आहे.संबंधित काही ठिकाणी अर्धा ते पाऊण तास इतका कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याची माहिती  स्थानिक नागरिकांनी दिली.

काही भागात पाणी वितरण जास्त झाल्याने तेथील नागरिक पाण्याच्या अपव्यय करताना दिसून येत आहे.तर काही ठिकाणी पाणी वितरण कमी झाल्याने पाण्याअभावी असणाऱ्या समस्यांमध्ये वाढ होत आहे.यासाठी  पालिका पाणीपुरवठा विभागाने  प्रत्येक विभागात ठराविक असलेल्या वेळेत व समान पाणी वितरण करणे गरजेचे(Alandi) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.