Pune : पुणे-सोलापूर रस्त्यावर दुचाकीच्या अपघातात सहप्रवाश्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे- सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर (Pune) फाटा येथे मोटारीने दुचाकीला मागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील सहप्रवाश्याचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी मोटारचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. हनुमंत बळीराम जाधवर (वय 38, रा. धाराशीव) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. या बाबत अप्पासाहेब नंदगावे (वय 34, रा. मांजरी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPC News Podcast 24 April 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

दुचाकीस्वार नंदगावे आणि जाधवर लोणी काळभोर कडून  हडपसर कडे निघाले होते. लोणी काळभोर फाटा चौकात अचानक एक मोटार आडवी आली. त्यामुळे दुचाकीस्वार नंदगावे यांनी दुचाकी थांबविली. त्या वेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने दुचाकीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील सहप्रवासी जाधवर यांना गंभीर दुखापत (Pune) झाली. उपचारादरम्यान जाधवर यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणी काळभोर पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.