Alandi : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज – जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या वाढदिवस निमित्त (Alandi) माऊलीं मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रींचे चलपादुकांची पूजा, अभिषेक, करून दर्शन घेण्यात आले. जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास राळेगणसिद्धी पुणे जिल्हा समिती, खेड तालुका समिती, आळंदी शहर समिती पदाधिकारी, समिती सदस्य यांचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांना दिर्घायुष्य  लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.याच दिवशी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

विविध सामाजिक उपक्रमांत आळंदी सिद्धबेट येथे अजाण वृक्ष पूजा, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पर्यावरण जनजागृती,  सिद्धबेट येथे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिलाताई शिंदे,  पशु कल्याण अधिकारी अँड.निलेश आंधळे गोरक्षक, माऊली दास महाराज,  बाळासाहेब चौधरी, अर्जुन मेदनकर, पिराजी नेवसे महाराज, आशा तापकीर, डॉ. हिरामण भुजबळ, महादेव घुले, सुनील वाळुंज, कैलास दुधाळे, अतुल सवाखंडे यांचा विशेष उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल सन्मानपत्र देऊन सामाजिक बांधिलकीच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.

 

   या प्रसंगी  जिल्हाध्यक्ष,सुरेश टाकळकर,खेड तालुका समिती अध्यक्ष प्रकाश पाचारणे, टोपे, माजी सरपंच कुंडलिक कोहिनकर, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर,उद्योजक राहुल चव्हाण, मनोहर दिवाने, नेचर फाउंडेशन अध्यक्ष भागवत काटकर, दक्षता समिती अध्यक्ष किरण नरके, सहदेव गोरे, शिरीष कारेकर, बाळासाहेब वहिले आदी मान्यवर उपस्थित (Alandi) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.