Alandi : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – शाळेत जाणाऱ्या 12 वर्षे मुलीला (Alandi)अडवून त्याची छेड करणाऱ्या तरुणाला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. हा सारा प्रकार 15 डिसेंबर रोजी आळंदी येथील शाळे जवळ घडला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी आळंदी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.24) फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून आळंदी पोलिसांनी देवानंद गणेश कदम (वय 24 रा वडगाव आळंदी ) याला अटक केली आहे.

Chinchwad : शहरात विकेंडसह इयर एंडिंगचीही तयारी जोरात; पोलिसांकडून खबरदारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Alandi)फिर्यादी यांच्या मुलीचे 12 वर्षे आहे हे माहीत असताना देखील आरोपीने तिच्या मोबाईलवर स्वतःचा फोटो स्टेटस व्हिडिओ पाठवला.

तसेच मुलगी शाळेत जात असताना तिचा रस्ता अडवून त्यांनी तिला गेटवरच थांबवले फोन करून तो तिला सतत त्रास देत होता. यावरून आळंदी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.