Ambulance Accident : हृदय प्रत्यारोपणासाठी हृदय घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात

एमपीसी न्यूज : विघ्नहर्त्याने विघ्न हरल्याची प्रचीती (Ambulance Accident) पुण्यात आज (बुधवारी) आली. यामध्ये हृदय प्रत्यारोपणासाठी हृदय घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेलाच भीषण अपघात झाला. मात्र, सुदैवाने हृदय व रुग्णवाहिकेतील सर्वजण सुरक्षित बचावले. हा अपघात आज दुपारी 12 च्या सुमारास नांदेड सिटीजवळ सातारा रोडवर झाला.

ही रुग्णवाहीका हृदय प्रत्यारोपणासाठी रुबी हॉल, पुणे येथे जात होती. मात्र, गाडी (Ambulance Accident) वेगात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी फरपटत गेली. यामध्ये रुग्णवाहिकेतील पाच व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत. वेळेत दुसऱ्या रुग्णावाहिकेला पाचारण करून हृदय पुढील प्रक्रीयेसाठी रुबी हॉलला पाठविण्यात आले. तर, जखमींना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहे. ही कारवाई PMRDA नांदेड सिटी अग्निशमन यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.