Pune : महिला तहसीलदारासह लिपिकाला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – आंबेगाव येथील तहसीलदार व लिपिकाला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आज (दि.15) करण्यात आली. 

सुषमा पांडुरंग पैकेकरी, (वय 41, तहसीलदार आंबेगाव रा. तहसीलदार निवास, घोडेगाव, जिल्हा पुणे), राकेश दिनकर लाडके, (वय 32, लिपिक, तहसीलदार कार्यालय, आंबेगाव, रा. मु. गोरेगाव ,पो.आव्हाट, ता.खेड, जिल्हा पुणे), अशी लाच घेताना पकडलेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांचे डबर/ गौण खनिज वाहतुकीचे डपंर वर अवैधरित्या गौण खनिज/ डंपर वाहतुकीची कारवाई करण्यात आली होती व त्यांचे वाहन जप्त करण्यात आले होते. तसेच तक्रारदार यांना कुरवंडी गावातील शेततळे खोदण्याचे काम मिळाले असून खोदकाम करून त्यातील गौण खनिज वाहतुकीची परवानगी मिळण्यासाठी आंबेगाव तहसीलदार कार्यालयात अर्ज केलेला होता. या दोन्ही कामांसाठी प्रत्येकी पन्नास हजार असे एकूण एक लाख  याप्रमाणे आरोपी क्रमांक एक यांनी एक लाख रुपयांची लाचेची मागणी करून त्यांच्या कार्यालयातील लिपिक आरोपी क्रमांक दोन यांच्याकडे देण्यास सांगितले त्याप्रमाणे आरोपी क्रमांक दोन यांना तक्रारदार यांच्याकडून रक्कम रुपये 1 लाख घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दिलीप बोरस्ते, अपर पोलीस अधीक्षक, दत्तात्रय भापकर, पोलीस उप अधीक्षक, सीमा मेहंदळे, पोलीस उप अधीक्षक पोलीस हवालदार खान, पोलीस नाईक टिळेकर, पोलीस शिपाई राऊत यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.