Talegaon : देहू लेबर सेंटर देहूरोडच्या अध्यक्षपदी दिलीप भोंडवे

खजिनदारपदी विनोद शिंदे

एमपीसी न्यूज – देहू लेबर सेंटर देहूरोडच्या अध्यक्षपदी दिलीप भोंडवे यांची तर खजिनदारपदी विनोद शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते शंकरराव भेगडे होते. जनरल सेक्रेटरीपदी सचिन तापकीर यांची तर उपाध्यक्षपदी रामचंद्र जगताप यांचीही बिनविरोध करण्यात आली. देहूरोड येथे झालेल्या संस्थेच्या कार्यालयात सर्वसाधारण सभा झाली.

यावेळी माजी जनरल सेक्रेटरी पांडुरंग भोंडवे, माजी उपाध्यक्ष पी.आर.कदम यांच्यासह सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंकरराव भेगडे यांनी बिनविरोध निवड झालेल्या कार्यकारिणीची घोषणा केली. कामगार क्षेत्रात या बिनविरोध निवडीचे स्वागत करण्यात आले आहे.

नूतन कार्यकरिणी :

अध्यक्ष- दिलीप भोंडवे, उपाध्यक्ष – रामचंद्र जगताप, जनरल सेक्रेटरी -सचिन तापकीर, सहसेक्रेटरी एस.आर.काकडे, खजिनदार- विनोद शिंदे, कार्यकारणी सदस्य – सुरेश दाभाडे, आशिष दाभाडे, धीरज लोहार, प्रसाद कातकडे, तुकाराम राक्षे, सचिन कातोरे, अशपाक शेख, संजय दुमडे, विजय राक्षे, केदारी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.