Article By Harshal Vinod Alpe : वाढदिवसाच्या दिवशी सहज डोक्यात आलेला विचार (एक कल्पना )

लेखक : हर्षल विनोद आल्पे, तळेगाव दाभाडे

एमपीसी न्यूज : माझा जन्म सकाळी पावणे 6 वाजता झाला, सीझर केलं गेल, जन्माला आलो तेव्हा तब्बल 8 पाउंडाचा होतो मी, जन्माला आलो तेव्हा रडण्याचा पातळ आवाज ऐकून आजी पासून सगळ्यांना अस वाटल की मुलगी झाली हो !!!! पहिली बेटी धनाची पेटी वेगेरे संकल्पना लढवल्या गेल्या, तेवढ्यात नर्स बाहेर आली आणि अभिनंदन करत म्हणाली की मुलगा झाला हो !!!!! आजी ला मला पाहायला येण्या आधी त्या काळात गाडी मध्ये एक रुपया मिळाला होता. त्या मुळे आजी ला खूप भाग्य शाली वेगरे वाटलो असेन, असो !!!!

मी प्रत्येक च गोष्ट करण्या आधी त्या बद्दल खूप विचार आणि कल्पना करत बसतो, हा माझा गुण ही आहे आणि दोष ही आहे, म्हणा, पण मी आज वाढदिवसाच्या दिवशी असा विचार करत होतो की, आपल मन इतक कल्पना शील आणि आपण इतका विचार करतो अनेक गोष्टींचा तर, आपण जन्माला येण्या आधी आई च्या पोटात आपण काय विचार करत असू ????? मी या गोष्टीबद्दल विचार करायला लागलो, तेव्हा सहज आठवलं ते हे अस ….

माझ्या आई च ऑपरेशन व्हायला पुष्कळ वेळ आहे, मला वेळ कळत नव्हती, ही संकल्पना च माझ्या गावी नाही, पण अस कानावर पडत होत की ऑपरेशन उद्या पहाटे करू, आणि मला एकदाचा बाहेर काढू, आता मला बाहेर काय ? हेच माहीत नव्हतं, त्यामुळे एक प्रकारच दडपण यायच, म्हणून मी पाय हलवायचो, तर आई च ओरडायची “आई ग” करून, अरे बापरे आईला त्रास झाला वाटत, म्हणून मग मी आई ला अजूनच बिलगायचो, पण हे बाहेर जायच विचार चक्र काही थांबत नव्हतं, बाहेर नक्की असेल तरी काय ? ही दुनिया म्हणजे नक्की काय असेल ? माझ्या अवती भवति काय असेल? या सगळ्या प्रश्नांनी पोटात गोळा च आला , या दुनिये कडे आधीच बघण्याची सोय असती तर किती बर झालं असतं, ना ! पण ती ही सोय नव्हती, म्हणून मग त्याच विचार चक्रात तसाच डोळे मिटून पडून राहिलो, अस्वस्थ पणे !!!!!

झोप लागणार एवढ्यात अचानक कसले कसले आवाज यायला लागले , दचकून उठलो , मी हलत होतो , म्हणजे तसा मी काही च करत नव्हतो , पण मी जागच्या जागी असून सुद्धा चालत होतो असा मला भास झाला , मग एका ठिकाणी थांबलो , बटन लावल्याचा जोरात आवाज आला , बाजूला बायंकांचे , पुरूषांचे आवाज ऐकू येत होते , ते मला त्रास देत होते , तरी ही मी झोपून च होतो , मला वाटत होतो की हे एक स्वप्न आहे , एवढ्यात मला एक धारधार टोक दिसू लागले , मग ते टोक हळू हळू मागे होत गेले , मग मी हळू हळू अलगद पणे वर वर यायला लागलो ,आणि !! मी या जगात आलो ,आल्या आल्या या जगाचा फील घेणार एवढ्यात कुणी तरी जोराचा चिमटा काढला , मग मला रडू फुटल , चक्क मी रडत होतो , तर तिथे असेलेले चक्क हसत होते , “ अरे उठला उठला” म्हणत टाळ्या वाजवत होते , मग हळू हळू माझे डोळे उघडायला लागले , मग आई ने “ना ग तडी” मला जवळ घेतले , त्या स्पर्शाने मला कळले की हीच आपली आई ….

मी या दुनिये कडे औत्सुक्याने बघत होतो , बघता बघता सगळे धुरकट झाले ,आणि हा हा म्हणता 34 /35 वर्ष निघून गेली , आज दुनिया मी बघू शकतोय , फील घेऊ शकतोय , पण ते जे नावीन्य होत अंधारातून उजेडाकडे येण्याचे ,ते मात्र आता नाहीस झालं , त्या वेळेला ती ज्योत पेटली पण आज वाढदिवशी काहीजण ती विझवतात , काळाचा महिमा दुसरं काय ?

आपल्याला सर्वांना आलेली निराशा जेव्हा आपण हे आठवू पाहतो की आपण या जगात कसे आलो ! तेव्हा ही निराशा आपोआप नाहीशी होऊन ही दुनिया नव्याने बघायला लागतो, आणि अजून ही एक गोष्ट आठवते की दुनिये कडे जेव्हा मी पहिल्यांदा बघत रडत होतो तेव्हा बाकी सगळे माझ्या येण्याने हसत होते, खुश होत होते……..

इतकेच ……………….

धन्यवाद ………………….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.