Chikhali News : लग्नाचे अमिश दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने अल्पवयीन मुलीला ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना जानेवारी 2021 ते 8 जुलै 2021 या कालावधीमध्ये चिंचवड, चिखली आणि पनवेल येथे घडली.

व्यंकटेश जयराम पवार (वय 22 रा. शरद नगर, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने शनिवारी (दि. 10) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी व्यंकटेश पवार यांच्यात प्रेमसंबंध होते. फिर्यादी मुलीचे वय अठरा पूर्ण नसल्याने वय पूर्ण झाल्यावर कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर आरोपीने एका रूममध्ये जावून ती अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही आता आपले लग्न होणारच आहे, आपण पत्नी पत्नी होणारच आहोत, असे बोलून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या मनात नसतानाही तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध निर्माण केले.

त्यानंतर फिर्यादी हिच्या आई-वडिलांना त्यांच्या प्रेमसंबंधा बाबत माहिती मिळाल्याने त्यांनी फिर्यादी अल्पवयीन मुलीला तिच्या काकाच्या घरी बदलापूर येथे सोडले. त्यानंतर आरोपी पवार याने तिला पनवेल येथे नेऊन शंकराच्या मंदिरात नेऊन लग्नाचा बनाव करून गळ्यात हार व नकली धातूचे मंगळसूत्र घातले. आपले लग्न झाले आहे, असे सांगून तिला हरिग्राम पनवेल येथे भाड्याच्या खोलीत नेऊन ठेवले. तिथे आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

त्यानंतर 8 जुलै 2019 रोजी फिर्यादी व आरोपी पोलीस चौकीत आले. त्यावेळी फिर्यादी यांनी ‘आम्ही दोघांनी लग्न केले आहे. मी सज्ञान असून व्यंकटेश पवार यांच्यासोबत जाणार आहे’, असे सांगून पीडित मुलगी त्याच्या सोबत गेली होती.

मात्र आरोपीने तिला तिच्या आई-वडिलांकडे आणून सोडले. त्यानंतर 10 जुलै रोजी फिर्यादी यांच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ करून ‘मी तुझ्या बरोबर लग्न करणार नाही. आता तुझा माझा काही संबंध नाही. तुझं तू बघून घे, असे सांगितल्याने आरोपीने आपल्याशी लग्नाचा बनाव करून अत्याचार केल्याची खात्री अल्पवयीन मुलीला झाली. तिने आरोपी पवार याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.