Pune News : पुण्यात मध्यम तर, घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता  

एमपीसी न्यूज – पुण्यात आज (रविवारी) आकाश ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच, घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. 

गेल्या 24 तासांत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात – 27mm, इंदापूर – 24.8mm, दौंड – 15mm आणि वेल्हे – 10mm पावसाची नोंद झाली आहे. पुण्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.

येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.