Vehicle Theft : भोसरी एमआयडीसी आणि चिखली मधून दोन दुचाकी तर चाकण मधून टेम्पोचे सायलेन्सर चोरीला

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी आणि चिखली परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी वाहने चोरून नेली. तर चाकण परिसरातून एका टेम्पोचे चार सायलेन्सर चोरून नेले आहेत. या तिन्ही प्रकरणात शनिवारी (दि. 10) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

ऋषिकेश बिभीषणराव ठोंबरे (वय 28, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी शनिवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत भारतमाता चौक, मोशी येथून चोरीला गेली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

धर्मराज रामजीत परमार (वय 42, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी चिखली परिसरातील एका हॉस्पिटलच्या पार्किंग मधून चोरीला गेली. ही घटना आठ जुलै रोजी रात्री साडेनऊ ते नऊ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत घडली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

रवी कुमार सिंग (वय 35, रा. ताथवडे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांचा टेम्पो चार जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता नाणेकरवाडी येथील वंडर कार शोरूमच्या मोकळ्या जागेत असलेल्या पार्किंगमध्ये पार्क केला. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी टेम्पोचे 60 हजार रुपये किमतीचे चार सायलेन्सर काढून चोरून नेले. हा प्रकार 5 जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.