Pimpri News : महापालिकेची ‘स्मार्ट सारथी हेल्पलाईन’ उद्या दुपारी तीन ते सहा या वेळेत बंद राहणार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेची ‘स्मार्ट सारथी हेल्पलाईन’ उद्या (सोमवार, दि. 12) दुपारी तीन ते सहा या वेळेत बंद राहणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत नागरिकांच्या सोयीकरिता ‘स्मार्ट सारथी हेल्पलाईन’ सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाईनचे महापालिकेच्या मुख्य वॅार रुममध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 12) दुपारी तीन ते सहा या वेळेत 8888006666 ही ‘स्मार्ट सारथी हेल्पलाईन’ बंद राहणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

उद्या सायंकाळी सहा नंतर हेल्पलाईन सुरळीत सुरू होईल. ही हेल्पलाईन कमीत कमी कालावधीत सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.