Wakad News : वाद मिटवण्यासाठी मागितली 50 लाखांची खंडणी, नऊ महिन्यांनी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटचा वाद मिटवून देतो, त्याबदल्यात 50 लाख रुपये आणि 16 हजार 400 चौरस फूट बांधकाम क्षेत्र अशी खंडणी मागितली.(Wakad News) हा प्रकार 9 मार्च 2022 रोजी वाकड येथे घडला याप्रकरणी नऊ महिन्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

याप्रकरणी विनायक किशोर गारवे (वय 39, रा. नवी सांगवी) हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.20) फिर्याद दिली त्यानुसार सोमनाथ लाहोट (वय 40, रा. तळेगाव दाभाडे) आणि त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri News : वयाच्या 63 व्या वर्षी अर्धांगवायूवर मात करत गिरवले कथकचे धडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ आणि त्याच्या साथीदाराने फिर्यादी यांच्या वाकड येथील ऑफिसमध्ये येऊन फिर्यादी यांचे वडगाव येथील बांधकाम साईटचा वाद मिटवून देतो, त्याबदल्यात 50 लाख रुपये रोख रक्कम आणि 16 हजार 400 चौरस फूट बांधकाम क्षेत्र देण्याची मागणी केली.(Wakad News) पैसे दिले नाहीतर फिर्यादीस काम करू देणार नाही, त्यांना कायमचे संपवून टाकील, अशी आरोपीने धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या एका कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज करून खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.