Bhosari News : तरुणाला कारची धडक, कार चालका विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सर्व्हिसिंगला दिलेली कार आणायला जात असलेल्या तरुणाला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. त्यात तरुण जखमी झाला. (Bhosari News) हा अपघात मंगळवारी (दि. 20) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास एमआयडीसी चौक, भोसरी येथे घडला.

विश्वजित विक्रम जाधव (वय 30, रा. शिवाजीनगर, पुणे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ अजिंक्य विक्रम जाधव (वय 26) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवानंद व्याकोड (वय 60, रा. वीरभद्रनगर, बाणेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad News : वाद मिटवण्यासाठी मागितली 50 लाखांची खंडणी, नऊ महिन्यांनी गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वजित जाधव यांनी त्यांची कार एमआयडीसी भोसरी येथील एका गॅरेजमध्ये सर्व्हिसिंगसाठी दिली होती. कार मंगळवारी सकाळी मिळणार असल्याने कार घेण्यासाठी विश्वजित गॅरेजमध्ये जात होते. एमआयडीसी चौकात रस्ता ओलांडत असताना (Bhosari News) आरोपी त्यांच्या कारमधून आले. त्यांनी कारने विश्वजित यांना धडक दिली. यामध्ये विश्वजित यांना दुखापत झाली आहे. आरोपी शिवानंद यांना ताब्यात घेऊन नोटीस देत सोडून दिले आहे. पोलीस नाईक संतोष हाके तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.