Chinchwad News : चौपाटी जवळ पार्क केलेली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज  – चिंचवड येथील रेल विहार कॉर्नर चौपाटीजवळ पार्क (Chinchwad News) केलेली दुचाकी अवघ्या पाऊण तासात अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 17) दुपारी अडीच ते सव्वातीन वाजता च्या कालावधीत घडली.

धनंजय दयानंद गोळे (वय 34, रा. किवळे, पुणे. मूळ रा. माळशिरस, सोलापूर) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari News : तरुणाला कारची धडक, कार चालका विरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोळे यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एमएच 07/वाय 3071) शनिवारी दुपारी अडीच वाजता रेल विहार चौपाटीजवळ पार्क केली. अवघ्या पाऊण तासात अज्ञातांनी दुचाकी चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.