Pimpri : स्वाईन फ्ल्यूने आणखी एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा 22 वर

एमपीसी न्यूज – स्वाईन फ्लूने आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत स्वाईन फ्ल्यूने 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (सोमवारी) आणखी 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 32 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

भोसरीमधील 60 वर्षीय रुग्णाला स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आढळल्यावरून रविवारी (दि. 9) शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाईन फ्ल्यूचा त्रास वाढल्याने त्यांना दुस-या दिवशी कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. सोमवारी (दि. 10) रोजी त्यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले. परंतु उपचार सुरु असताना शनिवारी (दि. 22) त्यांचा मृत्यू झाला.

स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आढळताच तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे, तसेच डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.