Mumbai Cruise Drug Case : 26 दिवसांनंतर आर्यन खान कारागृहाबाहेर, चाहत्यांचा जल्लोष

एमपीसी न्यूज – क्रुजवरील पार्टी ड्रग केस प्रकरणात अटक असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची जामीनावर सुटका झाली असून, 26 दिवसांनंतर आर्यन खान आर्थर रोड कारागृहाबाहेर आला आहे. आर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. आर्यन बाहेर येताच चाहत्यांनी जल्लोष केला. 

गुरुवारी आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर काल (शुक्रवारी) त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. पण जामिनाची प्रत तुरुंगात वेळेत पोहचली नाही म्हणनू आर्यनची कालची रात्र तुरुंगातच गेली. आज पहाटे 5.30 वाजताच आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून जामीन पत्रपेटी उघडण्यात आली. त्यामुळे आता आर्यनच्या जामिनासाठीच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आज सकाळी आर्यन कारागृहाबाहेर आला.

आर्यनला एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक जमा करावा लागेल आणि त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे. आर्यनच्या जामिनासाठी हायकोर्टाने 14 अटी घातल्या आहेत. आर्यन खान पोलिसांना कळवल्याशिवाय मुंबई सोडू शकणार नाही, तसेच आर्यनला अरबाज मर्चंट आणि या प्रकरणातील आरोपींसारख्या मित्रांशी आणि माध्यमांशीही बोलता येणार नाही. आर्यनला शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. न्यायालयीन सुनावणीत उपस्थित राहून आवश्यकतेनुसार तपासात सहकार्य करावे लागेल. न्यायालयाच्या आदेशानुसार, यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन झाल्यास, एनसीबीला जामीन रद्द करण्याची विनंती करण्याचा अधिकार असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.