Akurdi Crime News : सलोनमध्ये मसाज घेणा-या महिलेचा मित्रानेच केला विनयभंग

आरोपीला अटक 

एमपीसी न्यूज – सलोनमध्ये मसाज घेणा-या महिलेचा तिच्याच मित्राने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी मित्राला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. रॉयल सलोन, संभाजी चौक, आकुर्डी येथे गुरुवारी (दि.28) हा प्रकार घडला. 

मोहम्मद सिराज रज्जब अली (वय 22, रा. रेल विहार कॉलनी, बिजलीनगर, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पिडित महिलेनं शुक्रवारी (दि.29) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि अटक आरोपी हे मित्र आहेत. फिर्यादी महिला या रॉयल सलोन, संभाजी चौक, आकुर्डी येथे डोक्यास मसाज घेत होत्या. त्यावेळी आरोपीने त्यांचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीला ताब्यात घेतले असून, अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.