Maval News : पवनानगर येथे सरपंच, पवना शिक्षण समिती सहविचार सभा संपन्न

एमपीसी न्यूज – पवना शिक्षण संकुल पवनानगर येथे शुक्रवार (दि. 29) पवना विद्या मंदिर व मावळ तालुका सरपंच परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पवनमावळ पंचक्रोशीत सरपंच, पवना शिक्षण समिती सहविचार सभा संपन्न झाली. या सभेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मावळ तालुका सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष सुनिल (नाना) भोंगाडे, पवना शालेय समितीचे सदस्य नारायण कालेकर, प्रल्हाद कालेकर, करुंजचे सरपंच सदाशिव शेंडगे,कालेचे सरपंच खंडुजी कालेकर, महागाव सरपंच सोपान सावंत, वारुचे सरपंच शाहिदास निंबळे, सुनिल निंबळे,ठाकुरसाई गावचे सरपंच नारायण बोडके,कडधेचे सरपंच संजय केदारी, तिकोणा सरपंच ज्ञानदेव मोहोळ,किरण बोडके, येळसेचे सरपंच सिमाताई ठाकर, उपसरपंच अक्षय कालेकर, महागावचे उपसरपंच पांडुरंग पडवळ, उज्वला शिंदे पर्यवेक्षिका निला केसकर यांच्यासह परिसरातील 15 ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.

सभेमध्ये परिसरातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक समस्या, विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था, आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेले विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी उपायोजना, शाळेतील भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास याबाबत चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या अंजली दौंडे यांनी केले सुत्रसंचालन भारत काळे यांनी केले तर आभार सुनिल बोरूडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.