Thergaon Crime News : गाडीच्या व्यवहारावरुन मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा 

एमपीसी न्यूज – गाडीच्या व्यवहारावरुन मानसिक त्रास दिल्याने एका इसमाने बिल्डिंग मध्ये आत्महत्या केली. याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रॅंड कासा बिल्डिंग, थेरगाव येथे गुरुवारी (दि.28) दुपारी हा प्रकार घडला. 

अमोल कांबळे, नितीन माने (दोघेही रा. सातारा), संकेत भोसले, पवन कड आणि इतर एक जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आत्महत्या केलेल्या इसमाच्या पत्नीने शुक्रवारी (दि.29) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेच्या पतीला गाडीच्या व्यवहारावरुन मानसिक त्रास दिल्याने त्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.