Kasarwadi News : ज्योतिषाचार्य उमेश स्वामी ‘गोल्डन लाइफ टाइम आयकॉन अवार्ड’ने सन्मानित

एमपीसी न्यूज – एस्ट्रो वेदांग फाउंडेशन ऑफ एस्ट्रोलॉजी यांच्याकडून पिंपरी-चिंचवड शहरातील कासारवाडी येथील नामवंत व प्रसिद्ध ज्योतिषाचार्य उमेश स्वामी यांना ‘गोल्डन लाइफ टाइम व आयकॉन अवॉर्ड 2022’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पंजाब राज्यातील लुधियाना येथील आयोजित ज्योतिष संमेलनात त्यांचा गौरव करण्यात आला. या संमेलनामध्ये विश्वविख्यात ज्योतिषी सुरेश श्रीमली, लाल किताब विशेषतज्ज्ञ जी. डी. वशिष्ठ, ज्योतिषी डॉ. वाई. के. राखी, सर्व ब्राह्मण सभा महासभेचे अध्यक्ष शुभेश शर्मन, डॉ. अनिल मित्रा व पाल बालाजी ज्योतिष संस्थेचे विश्लेषक डॉ. अनिल व्यास हे उपस्थित होते.

सन्मानचिन्ह, मानपत्र, गोल्ड मेडल व श्रीकृष्णाची चांदीची मूर्ती या वस्तू देऊन उमेश स्वामी यांना सन्मानित करण्यात आले. स्वामी हे पिंपरी-चिंचवड मध्ये अनेक वर्षापासून ज्योतिष व वास्तू सल्लागार यांचे काम करतात. अनेक दिवाळी अंकामध्ये , वृत्तपत्रामध्ये ज्योतिष व वास्तू विषयावरती त्यांचे लिखाण असते. दरवर्षी त्यांचे भविष्य कोश हे पुस्तक प्रसिद्ध होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.