Pune : सध्या अजित पवारच मुख्यमंत्री – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्र्यांशी तुम्हाला काही बोलावे लागत नाही. कारण तुम्हीच सध्या मुख्यमंत्री आहात. डायनॅमिक नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितले जाते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गुणगान गात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करताच त्याला उपस्थित पुणेकरांनीही टाळ्या वाजवून दाद दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, बाळासाहेब बोडके यांना मी बोलण्याची विनंती केली, पण ते दादांना बहुतेक घाबरतात. अजित पवार रागीट वाटत असले तरी ते प्रेमळ आहेत. विमानांची सर्व माहिती या गॅलरीत मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला छोटे विमानतळ असावे. महापुरात त्याची कमतरता जाणवली. प्रत्येक तालुक्याला हेलिकॉप्टर उतरणारे हेलिपॅड असावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तर, ही मागणी लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच, बाळासाहेब बोडके हे दुसरे दादा (चंद्रकांत पाटील) यांच्या दबावापोटी बोलले नसल्याचा चिमटा पवार यांनी काढला. कारण, यापूर्वी आपण बोडके यांची मुलाखत घेतली, तेव्हा ते चांगले बोलत असल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like