Moshi News : रिक्षाची धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न, रिक्षाचालकास अटक

एमपीसी न्यूज – रिक्षाची धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला, याबाबत रिक्षाचालकास दिघी पोलिसांनी अटक केली आहे. दत्तनगर, डुडुळगाव, मोशी येथे शुक्रवारी (दि.11) सकाळी अकरा वाजता हा प्रकार घडला.

रिहाज गफूर शेख (वय 29, रा. दत्तनगर, डुडुळगाव, मोशी) असे अटक रिक्षाचालक आरोपीचे नाव आहे. याबाबत आदित्य अंकूश बोराटे (वय 21, रा. दत्तनगर, डुडुळगाव, मोशी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी रिहाज याने अराध्यम सोसायटीचे समोर दत्तनगर, डुडुळगाव, मोशी या जागेचा मालक मी आहे असे फिर्यादी आदित्य याला म्हणाले व प्रश्नावर प्रश्न विचारले. फिर्यादी यांनी प्रश्नांची उत्तरे न देता निघून गेले. याचा राग आल्याने आरोपीने आपली रिक्षा MH 14 GC 2107 यातून फिर्यादी यांचा पाठलाग केला व धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांचा पाठीचा मणका आणि हात फ्रॅक्चर झाला. असे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी अटक असून, दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.