Balewadi : ज्युनिअर प्रिमियर लीगचे 17 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी रोजी आयोजन

एमपीसी न्यूज- टॉट्स मॅगझिन तर्फे 17 व 18 फेब्रुवारी दरम्यान (Balewadi) बालेवाडी येथे 4 ते 14 वयोगटातील मुला मुलींकरता ज्युनियर प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 500 मुला-मुलींनी नाव नोंदणी केली असल्याची माहिती टॉट्स मॅगझिनच्या संस्थापिका लवलीन अलीमचंदानी यांनी दिली.

ही लीग दीर्घकालीन असून फेब्रुवारी ते मे पर्यंत सुरू राहणार आहे. चार टप्प्यांत होणाऱ्या या लीग मधे पोहणे आणि सायकलिंग दुसऱ्या टप्प्यात धावणे, तिसऱ्या टप्प्यात टेनिस आणि फुटबॉल आणि चौथ्या टप्प्यात बुद्धिबळ आणि कराटे स्पर्धा होणार आहेत. दि. 17 फेब्रुवारी रोजी पोहण्याची स्पर्धा असून 50 मीटर (10 वर्षांपर्यंत) आणि 100 मीटर (11 ते 14 वर्षे) बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक, बटरफ्लाय आणि फ्रीस्टाइल अशा चार विभागात होणार आहे तर 18 फेब्रुवारी रोजी 5 किमी अंतरातील सायकल स्पर्धा पार पडणार आहे.

PCMC : आगामी आर्थिक वर्षात ‘असे’ असतील मालमत्ता कराचे दर

मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना मेडल्स, चषक आणि 10 हजार रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. लीग मधे सहभागी होण्यासाठी टाऊनस्क्रिप्ट (Balewadi) या संकेतस्थळावर 15 फेब्रुवारी पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. टॉट्स या लहान मुलांसाठी असलेल्या मासिका तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. लहान मुलांना इंटरनेट आणि मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात ज्या मधे कामात व्यस्त असून ही पालक मुलांसाठी वेळ काढतात व उपक्रमात सहभागी होतात असं लवलीन यांनी सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.