Talegaon Dabhade : दहा महिन्यात अवघा 35 टक्के कर वसूल

एमपीसी न्यूज – एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या दहा महिन्यांच्या (Talegaon Dabhade) कालावधीत केवळ 35 टक्के मालमत्ता कर वसूल झाला आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये एकूण 38 हजार मालमत्ता धारक आहेत. यामध्ये मालमत्ता कराच्या माध्यमातून नगर परिषदेस 32 कोटी 95 लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. 100 टक्के कर वसूल करण्यासाठी कडक कारवाईच्या धोरणाचा अवलंब करावा लागला तर करणार असे मत मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये एकूण 38 हजार मालमत्ता धारक आहेत. यामध्ये मालमत्ता कराच्या माध्यमातून नगर परिषदेस 32 कोटी 95 लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे.यामध्ये जानेवारी अखेर 35 टक्के म्हणजेच 11 कोटी 58 लाख रुपये मालमत्ता धारकाकडून जमा झाले असल्याचे कर अधिकारी कल्याणी लाडे यांनी सांगितले.

या शंभर टक्के वसुलीमध्ये कोर्ट कारवाईच्या माध्यमातून 12 कोटी रुपये येणे बाकी आहे. तर शासकीय – निमशासकीय मालमत्ता मधून 55 लाख रुपये येणे बाकी आहे. ती जमा झाल्यास मार्च अखेर 52 दिवसात शंभर टक्के उद्दिष्टासाठी नगरपरिषदेला 8 कोटी 82 लाख रुपये वसूल करणे आवश्यक असल्याचे कर निरीक्षक विजय शहाणे यांनी सांगितले.

तळेगावातील मालमत्ता धारकाकडून पाणीपट्टी एकूण मागणी नऊ कोटी चार लाख, पाच (Talegaon Dabhade) फेब्रुवारी पर्यंत वसुली दोन कोटी 86 लाख रुपये असून ही वसुली 31.68% झाली आहे नागरिकांनी त्वरित पाणीपट्टी भरावी असे आवाहन.
जयंत मदने – पाणीपुरवठा कर अधीक्षक

मार्च अखेरपर्यंत मालमत्ता कर वसुलीसाठी नगरपरिषदेने मालमत्ता धारकांना मालमत्ता कर भरण्याचे आवाहन घंटागाडी द्वारे अलाउन्स करून केले आहे. तळेगाव हद्दीमध्ये एकूण 32 मुख्य ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून मालमत्ता कर भरण्याचे आवाहन केले आहे. या गोष्टी करून देखील मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरला नाही तर थकीत मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन बंद करणे, जंगम व स्थावर मालमत्ता सील करणे तसेच थकित मालमत्ता धारकांचे घरासमोर हलगी आदि वाद्य वाजवणे. तसेच जप्तीची नोटीस बजावून जप्ती करण्यात येणार असल्याचे कर अधिकारी कल्याणी लाडे यांनी सांगितले.

मालमत्ता कर वसुलीसाठी तळेगाव गावभाग व स्टेशन भाग असे दोन भाग केले असून यामध्ये दोन पथकांची गाड्यासह नेमणूक केली आहे. यामध्ये वसुलीसाठी नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश केला असल्याचे उपमुख्य अधिकारी ममता राठोड यांनी सांगितले.

तळेगावच्या विकासासाठी तसेच शासकीय भरघोस अनुदान प्राप्त करण्यासाठी तळेगावकर नागरिकांनी त्वरित मालमत्ता कर भरून सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याधिकारी एन.के. पाटील व उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.