Chandni Chowk News : उड्डाणपुलाच्या कामामुळे चांदणी चौकातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – उड्डाणपुलाच्या पिलर उभारणीच्या कामामुळे चांदणी चौकातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. त्यानुसार कोथरूड आणि साताऱ्याच्या दिशेने जाणारा सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी याबाबत आदेश काढला आहे. या आदेशानुसार भुगाव, एनडीए आणि कोथरूड येथून येणारी वाहने हॉटेल व्हिवा इनपासून डाव्या दिशेकडील पाषाण रस्त्याला जातील.

_MPC_DIR_MPU_II

तसेच, पाषाण, बावधनवरून येणा-या वाहनासाठी चांदणी चौकातील पूल बंद राहील. या वाहनांना व्हिवा इनपासून उजव्या दिशेला जावून हायवेला यावं लागेल आणि तिथून कोथरूड / सातारा दिशेने जाता येईल, असे या आदेशात म्हंटले आहे.

पुढील आदेशापर्यंत या वाहतूक बदलाचे पालन वाहन चालकांनी करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.