Bebedohol Accident : मोटारसायकलच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : बेबेडोहोळ गावात 17 जून रोजी किर्लोस्कर कॉलेजजवळ चांदखेड रोडवर दोन मोटारसायकलच्या (Bebedohol Accident) धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला.

सचिन मेगळे (वय 25 वर्षे, रा. सावरदारी, तालुका खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत रोहित शिंदे (वय 21 वर्षे, रा. शिवणे) यांनी शिरगाव पोलिस चौकीत फिर्याद दिली आहे. श्रीधर तिले (वय 20 वर्षे, रा. शिवणे) हा आरोपी असून तो पवना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

Bhosri Murder Case : अल्पवायीन मुलाने आईसोबत अनैतिक संबंध असणाऱ्या व्यक्तीचा केला खून

शिरगाव पोलिस चौकीचे हवालदार अतुल भोसले म्हणाले, की फिर्यादी व त्यांचा मित्र जो आरोपी आहे असे दोघे  केटीएम मोटारसायकल MH01, बीएल 1758 वर शिवणे ते नेरे दत्तवाडी येथे बेबेडोहोळ मार्गे जात होते. आरोपी ही मोटारसायकल चालवत होता.

आरोपीने त्याच्या ताब्यातील वाहन  (Bebedohol Accident) हयगयीने व अविचाराने, निष्काळजीपणे चालवून सचिन मेगळे याच्या मोटारसायकल नं एमएच 14 सीक्यू 6046 ला समोरून जोरात धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. फिर्यादी किरकोळ जखमी झाला आहे. तिघांना एकच ऍम्ब्युलन्सने पवना हॉस्पिटलला नेण्यात आले होते, पण मेगळेचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.