Teacher’s award : अभिमानास्पद ! साते येथील आदिनाथ आगळमे यांना पुणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील साते येथील असलेले आदिनाथ आगळमेयांना पुणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याने पंचक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.(Teacher’s award) अत्यंत खडतर परिस्थितून प्रगती करत ते इथपर्यंत पोहचले आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा साते, माध्यमिक शिक्षण समर्थ विद्यालय तळेगाव व उच्च शिक्षण इंद्रायणी विद्यालय येथे झाले.एमए बीएड एमएड पदवी मिळवत ते शिक्षक झाले. रमेश कुमार सहानी येथील शाळेचा निकाल सलग 8 वर्षे 100 टक्के लागत आहे त्यामागे आदिनाथ सरांचा मोलाचा वाटा आहे.
Student Drowned : सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू
आई वडीलांनी शेती व्यवसाय करत आदिनाथ यांना उच्चशिक्षित केले. एमपीसी न्यूज सोबत बोलताना त्यांनी सांगितले की, “आई, वडील, पत्नी, मित्र परिवार आणि शिक्षक मार्गदर्शक या सर्वांची मोठी साथ लाभली, हा पुरस्कार आई वडील यांना समर्पित करत आहे तसेच वडिलांचे गेल्यावर्षी कोरोनाच्या काळात निधन झाले, (Teacher’s award) त्यानंतर खूप मोठ्या दुःखात सावरताना अवघड गेले, माझे मार्गदर्शक आणि सहानी स्कूल चे संचालक नारायण ढोरे यांनी सुद्धा खूप सहकार्य केले आज तेही नाहीत परंतु या सर्वांच्या योगदानाने आज मी इथपर्यंत पोहचलो आहे.”
दरम्यान सोहळ्याला खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे प्रमुख राजेश गायकवाड सर,(Teacher’s award) तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानिमित्ताने श्री रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड जूनियरकॉलेज वडगाव मावळचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बाळासाहेब म्हाळसकर, उपाध्यक्ष सचिन नारायण ढोरे, सचिव नंदकुमार ढोरे, मुख्याध्यापक टी एन साई लक्ष्मी यांनी अभिनंदन केले.