Chinchwad : भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती उत्साहात

एमपीसी न्यूज – भारताचे प्रथम शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची 130 वी जयंती समाजवादी पार्टी पिंपरी चिंचवड शहर यांच्यातर्फे शहर कार्यालयात साजरी करण्यात आली.

समाजवादी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांच्या हस्ते भारतरत्न अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. समाजवादी पार्टी उपाध्यक्ष सालार शेख, शहर उपाध्यक्ष सालीम सय्यद, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रवी यादव, पिंपरी-चिंचवड शहर संघटक साजिद शेख, हिसमुद्दिन अन्सारी, राम यादव, अहमद कुरेशी, पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष वाहिदा शेख आदी उपस्थित होते.

रफिक कुरेशी म्हणाले, “पुण्याच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरात भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद भवन उभारण्यात यावे, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात येत आहे. याबाबत वारंवार मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा देखील करण्यात येत आहे. ही मागणी पूर्ण न केल्यास मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारण्यात येईल.” सूत्रसंचालन शहर महासचिव मोसिन शहा यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.