Bhoasri : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विनयभंग

एमपीसी न्यूज- अश्लील फोटो वायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी गुरुवारी (दि. 11) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका 14 वर्षीय पीडितेने फिर्याद दिली असून अमोल घरगिरे (रा. दिघी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने पीडित मुलीची ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवले. तिचे अश्लील फोटो काढून फिर्यादीच्या मामाला पाठवले. तसेच लग्न लावून द्या अन्यथा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. मार्च 2019 मध्ये हा प्रकार घडला. पोलीस निरीक्षक गुन्हे देवेंद्र चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.