Wakad : ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र लंपास

एमपीसी न्यूज- दुचाकीस्वार चोरटयांनी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले. या प्रकरणी गुरुवारी (दि.11) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी एका 54 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला या 6 एप्रिल रोजी त्यांच्या शोजारी राहणाऱ्या महिलेसह वाकड येथील दत्त मंदिरात आरतीसाठी गेल्या होत्या. आरती करून घरी परतत असताना दुचाकीवरून दोन इसम आले. त्यातील एकाने फिर्यादीच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे 55 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र हिसकावले. पोलीस उपनिरीक्षक एस.बी.बाबर अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.