Shirur : शिरूरमधून 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ; तीन जणांची माघार

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात 26 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याच्या मुदतीत आज (शुक्रवारी) तीन जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता शिरूरमधून 23 जण आपले नशीब अजमावणार आहेत. तथापि खरी लढत भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यामध्ये असणार आहे.

अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे

डॉ. मिलिंदराजे भोसले
ऍड अनिल बाबू सोनावणे
अल्ताफ करीम शेख

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.