Bhosari : आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या माध्यमातून स्थानिक उत्पादने पोहोचणार जागतिक पातळीवर – अजय सायकर (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- भोसरी विधानसभा मतदारसंघातील मोशी येथे भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र साकारले जात आहे. या प्रदर्शन केंद्रामुळे स्थानिक व्यावसायिकांची उत्पादने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी मोठी मदत होणार आहे, असे मत माजी नगरसेवक अजय सायकर यांनी व्यक्त केले.

अजय सायकर म्हणाले, “मोशी येथे पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन केंद्र उभारण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 975 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रदर्शन केंद्राच्या निमित्ताने उद्योग जगताकडून होणाऱ्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र या प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून सुमारे 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून 875 कोटी रुपयांच्या तरतुदीसाठी आमदार महेश लांडगे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने या निधीसाठी सकारात्मकता दर्शविली आहे.

हे प्रदर्शन केंद्र आशिया खंडातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र असणार आहे. प्रदर्शन केंद्रांमध्ये स्थानिक व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रामुळे व्यवसायिक दळणवळणाचा चालना मिळेल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. औद्योगिक आणि कृषी प्रदर्शनामुळे व्यवसायाच्या संधी देखील निर्माण होतील. उद्योगधंद्यांना चालना मिळेल. यामुळे गुंतवणूक देखील वाढेल. लघुउद्योजक बचत गटांसाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल. तसेच हॉटेल व्यवसायाला देखील चालना मिळेल, असेही सायकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.