Bhosari : कंपनीतील साहित्याची चोरी करणाऱ्या कामगाराला अटक

एमपीसी न्यूज – कंपनीतील साहित्याची चोरी करणाऱ्या कामगाराला अटक करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 16) भोसरी एमआयडीसीमधील कोरस इंडिया लिमिटेड या कंपनीत घडली.

संपत संजय हुलगुंडे (वय 26, रा. मोशी, मुळ रा. भूगाव, ता. जिंतूर, जि. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी योगेश रवींद्र तापकिरे (वय 42, रा. शाहूनगर चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी येथे कोरस इंडिया लिमिटेड ही कंपनी आहे. आरोपी संपत या कंपनीत काम करतो. सोमवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास कंपनीतून बाहेर येताना संपत याने पाच हजार पाचशे रुपये किमतीचे ॲल्युमिनियम फिल्टर आणि इतर साहित्य पायाला चिकटपट्टीने बांधून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्याची चोरी पकडली गेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संपत याला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.