Bhosari : दोन सराईत वाहन चोरट्यांना भोसरी पोलिसांकडून अटक; सव्वा तीन लाखांच्या नऊ दुचाकी जप्त

0

एमपीसी न्यूज – भोसरी पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख 20 हजारांच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सहा पोलीस ठाण्यातील नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

मारुती पांडुरंग साबळे (वय 25, रा. तळेगाव दाभाडे), आकाश बापू लाडे (वय 19, रा. दशेरे, ता. कराड, जि. सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, आशिष गोपी यांना दोन वाहन चोरांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मारुती आणि आकाश या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख 20 हजार रुपये किमतीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे भोसरी, निगडी, वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन, पिंपरी, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, अजय डगळे, सुमित देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, बाळासाहेब विधाते, संदीप जोशी, आशिष गोपी, सागर जाधव, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like