Bhosari : विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घरगुती कारणावरून सासरच्या लोकांनी (Bhosari) विवाहितेचा छळ केला. याबाबत सासरच्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 20 एप्रिल 2018 ते 6 मार्च 2023 या कालावधीत भोसरी येथे घडला.

पती सुरेश उर्फ जितू धनराज वाघ, सासू, दीर विजय धनराज वाघ, नणंद, नंदावा दिलीप पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PMRDA : पीएमआरडीएच्या गृहयोजना ई-नोंदणी केंद्राचा शुभारंभ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या लोकांनी फिर्यादी विवाहितेला वारंवार शिवीगाळ, टोमणे अपमानित केले. फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना वारंवार माहेरी पाठवले. कल्याण येथील एका महिलेच्या घरी फिर्यादीस काम करण्यास भाग पाडले.

मुलगा दत्तक देण्याच्या कारणावरून फिर्यादीवर (Bhosari) दबाव टाकून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.