Chakan News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – एका तरुणाने 17 वर्षीय मुलीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यात मुलगी गरोदर राहिली. (Chakan News) हा प्रकार 5 ऑगस्ट 2022 ते 2 मार्च 2023 या कालावधीत आंबेठाण चौक, चाकण येथे घडला.

पांडुरंग किसन झाडे (वय 26, रा. चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune News : मानवी साखळी द्वारे ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियान 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी पांडुरंग याने पीडित मुलीसोबत जवळीक साधून तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी नेले. (Chakan News) तिथे मुलीला तिच्या घरच्यांना जीवे मारून टाकण्याची तसेच तिची बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यामध्ये मुलगी गरोदर राहिली असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी पांडुरंग याला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.