Pune News : मानवी साखळी द्वारे ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियान 

एमपीसी न्यूज – धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी आयोजित केले जाणारे खडकवासला जलाशय रक्षण अभियान आज (मंगळवारी) हिंदु जनजागृती समिती, (Pune News) खडकवासला ग्रामस्थ आणि समविचारी संघटना यांच्या वतीने राबविण्यात आले.

खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून जनतेचे प्रबोधन केले आणि त्यांना धरणामध्ये उतरू दिले नाही. धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून जलाशयात उतरणे, हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबविणे, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रारंभीपासून प्रबोधन करत आहे.

भगवान श्रीकृष्णाच्या प्रतीमा पुजनाने अभियानाला प्रारंभ झाला.(Pune News) या प्रसंगी खडकवासला मतदार संघाचे विद्यमान आमदार  भीमराव (अण्णा ) तापकीर यांनी नारळ वाढवून अभियानाचे उद्घाटन केले. खडकवासला विधानसभा मतदारसंघ आणि भाजपचे अध्यक्ष श्री सचिन मोरे, खडकवासल्याचे माजी सरपंच विजय कोल्हे, माजी नगरसेवक मा. बाळासाहेब नवले, व्यापारी संघटना पुणेचे अध्यक्ष  गिरीश खत्री, हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांसह आदी उपस्थित होते.

Pune News : लौकिक एफ.ए., संगम यंग बॉईज आमदार चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

खडकवासला पाटबंधारे पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता  विजय पाटील, खडकवासला पाटबंधारे पुणेचे शाखा अभियंता सुभाष शिंदे, खडकवासला धरण पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियंता  दत्तात्रय कापसे, सिंहगड रोड, क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक  रुपेश मते, अण्णासाहेब मगर कॉलेजच्या साहाय्यक प्राध्यापक सविता कुलकर्णी, गोर्हे बुद्रुकचे उपसरपंच सुशांत उपाख्य बाबा खिरीड यांनीही अभियान स्थळी भेट दिली आणि अभियानात सहभागी झाले.

प्रबोधनानंतर अनेक नागरिकांनी अभियानाचे विशेष कौतुक केले. पोलीस-प्रशासनाचेही या अभियानाला उत्तम सहकार्य लाभले. पाटबंधारे विभागाच्या वतीने धरण परिसरात सूचनात्मक फलक लावण्यात आले अश्या प्रकारे सहभागी होत हे अभियान यशस्वी केले.(Pune News)अशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे 12 मार्चलाही हे अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.