Pune News : लौकिक एफ.ए., संगम यंग बॉईज आमदार चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

एमपीसी न्यूज : लौकिक एफए, संगम यंग बॉईज आणि केपी इलेव्हन संघानी सहज विजय मिळवून आमदार करंडक 2023 फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. (Pune News) शासकीय पॉलिटेक्निकच्या मैदानावर हे सामने सुरु आहेत.  

राज ढमढेरेने केलेल्या तीन गोलच्या जोरावर लौकिक एफए संघाने एबीसी एफसी संघाचा 6-0 असा पराभव केला. लौकिकसाठी अन्य गोल संकेत पवारने दोन, तर रोहन सुनारने एक गोल केला.

केपी इलेव्हन संघाने रोमारियो, विकी परदेशी आणि अल्फ्रेड नेगलने केलेल्या गोलच्या जोरावर आर्यन्स एफसीचा 3-0 असा पराभव केला.

अन्य एका सामन्यात संगम यंग बॉईंजने रेंजहिल्स यंग बॉईज संघाचा 1-0 असा पराभव केला. एकमात्र विजयी गोल क्लिनिंग मार्शिलॉंगने केला.

 

निकाल –

संगम यंग बॉईज 1 (क्लिनिंग मार्शिलॉंग 7 वे मिनिट) वि.वि. रेंज हिल्स यंग बॉइज 0

लौकिक एफ.ए. 6 (संकेत पवार 2 रे, 46 वे मिनिट, राज ढमढेरे 19 , 50 , 57 वे मिनिट, रोहन सुनार 48 वे मिनिट) वि.वि. एबीसी एफसी 0

केपी इलेव्हन 3 (रोमारियो नाझरेथ 36 वे, विकी परदेशी 47 वे, अल्फ्रेड नेगल 61 वे मिनिट) वि.वि. आर्यन्स एस. सी. 0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.