Bhosari : एक लाखाच्या साहित्याचा अपहार केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – चौघांनी (Bhosari) मिळून शिक्षण संस्थेच्या आवारातून एक लाखाचे साहित्य विश्वासघात करून नेत त्याचा अपहार केला. हा प्रकार 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2022 या कालावधीत शाहू शिक्षण संस्थेच्या आवारात इंद्रायणीनगर भोसरी येथे घडला.

अजय आबासाहेब साळुंखे (वय 42, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनायक सूर्यकांत पाटील, नूतन जाधव, रोहित जाधव आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC News : नर्सिंग होम, रुग्णालयांच्या शुल्कात वाढ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या (Bhosari) कंपनीकडून आरोपींनी विश्वासाने साहित्य घेतले. तीन संगणक, प्रिंटर, हार्ड डिस्क, मॉनिटर, कॅमेरा फ्लॅश, कॅमेरा ऍक्सेसरी, टीपीलिंगचा स्विच, एलईडी टीव्ही, मोबाईल फोन, कागदपत्रे आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख एक हजार 700 रुपये किमतीचा ऐवज घेऊन जात त्याचा अपहार केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.