Bhosari Crime News : कत्तलीसाठी गाईंची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कत्तलीसाठी चारचाकी वाहनातून गाईंची वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार ते पाच अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार देवकर वस्ती, चक्रपाणी वसाहतच्या पाठीमागे बुधवारी (दि. 30) रात्री उघडकीस आला.

नीलेश विजय चासकर (वय 32, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन गावरान गाई व एक जर्सी गाय अशा तीन गाईंची आरोपींनी वाहतूक केली. देवकर वस्ती, चक्रपाणी वसाहतच्या पाठीमागे बुधवारी (दि. 30) रात्री एकच्या सुमारास सदर गायींची कत्तल करत असताना आरोपी दिसून आले.

कारवाईसाठी आलेल्या पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी त्यांच्याकडील चारचाकी वाहनात बसून पळून गेले. त्यावेळी पोलिसांनी त्यांची गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी वाहनातून भरधाव वेगात घेऊन निघून गेले.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.